9 महिन्यात तर बाळ जन्माला येतं, यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही - अजित पवार
Admin

9 महिन्यात तर बाळ जन्माला येतं, यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही - अजित पवार

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार या विषयावरुन राजकीय वर्तुळातून टीका करण्यात येत आहे.

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार या विषयावरुन राजकीय वर्तुळातून टीका करण्यात येत आहे. यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंगोलीमधील सभेवेळी बोलताना अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अजित पवार म्हणाले की, 9 महिन्यात तर बाळ जन्माला येतं. यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. गेल्या सात महिन्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. सगळ्यांना सांगितले जाते तुम्हाला मंत्री करतो. तुम्हाला मंत्री करतो. ते म्हणतात कधी ? त्यांच्या घरच्यांनी सूट शिवले. फार गळा आवळायची वेळ आली पण मंत्रीपद काही मिळेना. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

यासोबतच राज्यातील सरकारला सात महिने झाले तरी मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. राज्यात कर्तृत्वान महिला नाहीत का? 20 लोक मंत्रिमंडळात आहेत. त्यात एखादी महिला मंत्री केली असती तर काही बिघडले असते का? फक्त म्हणता महिलांना संधी देऊ. पण कधी देणार? असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com