राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंच्या कारला अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंच्या कारला अपघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंच्या कारला अपघात
Published by :
Siddhi Naringrekar

विकास माने, बीड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंच्या कारला अपघात झाला आहे. परळी शहरातील आझाद चौकात मध्यरात्री हा अपघात झाला आहे. चालकाच वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. अपघातात धनंजय मुंडेंच्या छातीला किरकोळ मार बसला आहे. डॉक्टरांकडून त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

“मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतत असताना, रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये” अशी धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Admin
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com