Jitendra Awhad
Jitendra AwhadTeam Lokshahi

“गाईला पुढून मिठी मारली तर शिंग मारेल अन् मागून मिठी मारली तर…- जितेंद्र आव्हाड

१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून सगळीकडे साजरा केला जातो.
Published by :
Siddhi Naringrekar

१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. मात्र यावेळी केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करावा, असं आवाहन केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड म्हणाले की, प्रेम कुणावर करावं यासाठी काहीही बंधणं नसतात. प्रेम कुणावर करावं? याबाबत काही आचारसंहिता नाहीये. आता त्यांनी सांगितलं की, गाईवर प्रेम करा… गाईवर प्रेम करायला तशी काही हरकत नाही. पण गाय आणायची कुठून? हा प्रश्न आहे. त्यादिवशी हजारोंच्या संख्येनं तरुण-तरुणी बाहेर पडतात. मग त्यांच्यासाठी गाई शोधायच्या कुठे? त्यांना गाय मिळणार कुठे? मग सरकार कुठल्या तरी ठिकाणी गाई उभ्या करणार आहे का?” असे आव्हाड यांनी सरकारला विचारले आहे.

यासोबतच ते म्हणाले की, “गाईला मिठी मारताना अनेक अडचणी आहेत. गाईला पुढून मिठी मारली तर ती शिंग मारणार आणि मागून मिठी मारली तर ती लाथ मारणार… तिचं पोट इतकं मोठं असतं की तिच्या पोटाला मिठीच मारता येणार नाही. त्यामुळे गाईला मिठी कशी मारायची? याचं प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवावं लागेल. त्यासाठी ‘सरकार गाईला मिठी कशी मारायची?’ याचं प्रात्यक्षिक टीव्हीवर वगैरे दाखवणार आहे का? असे आव्हाड म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com