भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या जीवाशी खेळ करत आहे; राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका
Admin

भाजपा खासदार गिरीश बापट यांच्या जीवाशी खेळ करत आहे; राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका

कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

याच पार्श्वभूमीवर सर्वजण जोरदार प्रचार करत आहेत. भाजपाकडून विशेष प्रयत्न केलं जात आहेत. भाजपाचा प्रचार सुरु झाला असून त्यात भाजपाने पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना प्रचारात सामील करुन घेतले आहे. त्यांची तब्येत ठीक नाही आहे. ऑक्सिजन सिलेंडरसह व्यासपीठावर आले. नाकात ऑक्सिजनची नळी असताना गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

प्रशांत जगताप म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजपा त्यांच्या जीवनाशी खेळ करत आहे,गेल्या पाच वर्षात कोणत्याही निर्णय प्रक्रियेत गिरीश बापट यांचा समावेश करण्यात आला नाही, मुळात गिरीश बापट यांची प्रकृती अस्वस्थ आहे. त्यांना त्रास होत असताना, इतर व्हायरल संसर्गापासून त्यांना दूर ठेवा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तरीही भाजपाच्या नेतृत्वाने त्यांना प्रचाराला येण्यासाठी गळ घातली. पण आता कसबा निवडणुकीच्या वेळी बापटांची भाजपाच्या नेतृत्वाला आठवण आली. अशी टीका जगताप यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com