ताज्या बातम्या
पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार
अमोल धर्माधिकारी, पुणे
पुणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमीच्या समोर गोळ्या झाडण्यात आल्या. पाच गोळ्या लागल्यामुळे केइएम हँस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे.
गणेश कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड आणि तुषार आबा कदम अशी संशयित आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यात गणेश कोमकर हा कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा जावई असल्याची माहिती मिळत आहे.
आरोपी दुचाकीवर आले आणि पाच राऊंड फायर केले. आरोपींनी वनराज आंबेकर यांच्यावर गोळीबार केल्यावर कोयत्यानेही वार केला आणि आरोपींनी तिथून पळ काढला. वनराज आंदेकर यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.