jitendra Awhad
jitendra AwhadTeam Lokshahi

भाजपा-शिंदे गटातील नेत्यांच्या वादावर आव्हाडांचं मोठं विधान; म्हणाले, एकाच्या छातीत गोळ्या...

राज्यात एकत्र सत्तेत असलेले भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटातील नेत्यांमध्ये हाणामारी झाली आहे.
Published by :
shweta walge
Published on

राज्यात एकत्र सत्तेत असलेले भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटातील नेत्यांमध्ये हाणामारी झाली आहे. त्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'काय सुरू आहे ते ओळखा…'असं सूचक विधान केलं आहे.

ठाण्यात कोणत्या नेत्याचा बंगला पाडला जाणार आहे? असं विचारलं असता जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “कारवाई कोणावर होणार? हे तुम्हाला दोन-चार दिवसात कळेलच. जेव्हा काहीजण बंगला पाडण्यासाठी जातील, तेव्हा तुम्हाला कळेल. जरा थांबा… थोडा सस्पेन्स राहू द्या…” असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

पुढे ते म्हणाले की, दोन गाड्यांमधून समोरासमोरून गोळीबार होतो. या प्रकरणात केवळ एकावरच गुन्हा दाखल केला जातो. दुसऱ्याला सोडून दिलं जातं. त्यावर कोणताही गुन्हा दाखल केला जात नाही. एकाच्या छातीत गोळ्या घुसल्या, त्याची तक्रारच दाखल करून घेतली नाही. म्हणजे आम्ही सांगितलं तरच तक्रार घ्यायची, आम्ही सांगितलं नाही तर तक्रार घ्यायची नाही, असा कारभार सुरू आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमकी कोण चालवत आहे? असा प्रश्न देखील आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

jitendra Awhad
ठाकरेंच्या अडचणीत वाढ ; रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com