Nitesh Rane
Nitesh RaneTeam Lokshahi

माझ्या शर्टाच्या गुंडी एवढीच त्या आमदाराची उंची; अशी टीका नितेश राणेंवर कुणी केली?

नितेश राणे हे नगरमध्ये आले होते.

नितेश राणे हे नगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता टीका केली. नितेश राणे म्हणाले होते की, पुढच्यावर्षी 2024 आहे. जो कार्यक्रम आहे तो एकदाच करू. मी स्वतः प्रचाराला येणार आणि एकदाच या लोकांना हिंदुंची ताकद दाखवणार. स्थानिक आमदार तुम्हाला वाचवायला येणार काय? माझ्या नजरेला उभा राहत नाही तो. उगाच माझ्या वाटेला येऊ नका. असे नितेश राणे म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संग्राम जगताप म्हणाले की, आज नगर शहरात स्वाभिमान नसलेला एक आमदार आला होता. त्यांना नजरेला नजर मिळवायची असेल तर त्यांनी सांगावं आम्ही निश्चित येऊ.स्थानिक आमदार माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. असं त्यांनी सांगितलं. निश्चितच. उंचीचा प्रॉब्लेम असल्याने नजरेला नजर मिळत नाही. माझ्या शर्टाच्या पहिल्या गुंडी एवढीच त्या आमदारांची उंची आहे. असे जगताप म्हणाले. यावर आता नितेश राणे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com