Amol Kolhe
Amol Kolhe

खासदार अमोल कोल्हेंचा महायुतीवर हल्लाबोल; पत्रकार परिषदेत म्हणाले, "यूज अँड थ्रो ही पॉलिसी..."

"मला वैयक्तीत काय वाटतं, यावर महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही. वैयक्तीक आणि राजकीय, या भूमिका कायम वेगळ्या असतात. त्या वेगळ्या ठेवाव्यात, असं मला वाटतं"
Published by :

Amol Kolhe Press Conference : शिवसेना मेळाव्यात रामदास कदम म्हणाले, अजित पवार थोडे उशिरा आले असते, तर आमचा स्ट्राईक रेट वाढला असता, यावर बोलताना कोल्हे म्हणाले, मला खरंतर आश्चर्य वाटलं की, ही गोष्ट शिंदे गटाकडून समोर आली. भारतीय जनता पक्षाचा जर पूर्व इतिहास बघितला, तर सातत्याने त्यांच्याकडे यूज अँड थ्रो ही पॉलिसी असल्याचं पाहायला मिळत आहे. मला असं वाटतं की, महायुतीचा हा अंतर्गत प्रश्न आहे. मला वैयक्तीत काय वाटतं, यावर महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही. वैयक्तीक आणि राजकीय, या भूमिका कायम वेगळ्या असतात. त्या वेगळ्या ठेवाव्यात, असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर ज्या पद्धतीनं पक्ष फोडण्यात आले, चिन्ह पळवण्यात आले, पक्षांची नावं पळवण्यात आली, पण लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेनं पक्ष फोडण्याचं राजकारण नाकारलं आणि महाराष्टाचा स्वाभिमान दाखवून दिला. याबद्दल मराठी जनतेचं आभार मानलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर सडकून टीका केली.

मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना कोल्हे म्हणाले, प्रत्येकाच्या मागण्यांवर यापूर्वीही कोणत्या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत. जातनिहाय जणगणना होऊ नये, यानुसार आकडेवारी समोर आली, तर या माध्यमातून आपल्याला सक्षम पर्याय दिसू शकतो.

आज अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. प्रत्येक केंद्रावरील ३० ते ३५ विद्यार्थ्यांना मानसिक समुपदेशन घ्यावं लागतं, विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा धक्का आहे. या प्रकारची जबाबदारी केंद्र सरकारने घेणं गरजेचं आहे. असे काही गैरप्रकार होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. पुढील काळात नीटची कितपत आवश्यकता आहे, राज्य पातळीवर प्रवेश प्रक्रिया सुरु कराव्यात. यासंदर्भातील पर्यायांची चाचपणी होणे गरजेचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com