'भाजपवर विश्वास ठेवू नका' 'त्या' बैठकीबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा

'भाजपवर विश्वास ठेवू नका' 'त्या' बैठकीबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीबाबत सांगितले आहे.
Published by :
shweta walge

ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या ‘हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसाईड’ या पुस्तकांच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबरी मशिद प्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीबाबत सांगितले आहे.

शरद पवार म्हणाले की, तत्कालीन भाजप नेत्या विजया राजे सिंधिया यांनी तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, असं आश्वासन दिलं होतं. नरसिंह राव यांनी त्यांच्या मंत्र्यांच्या सल्ल्याविरुद्ध त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता. दरम्यान, नरसिंह राव सरकारमध्ये शरद पवार संरक्षण मंत्री होते. गृहमंत्री आणि गृहसचिव यांना वाटलं की, काहीही होऊ शकतं, परंतु नरसिंह राव यांनी सिंधियावर विश्वास ठेवणं पसंत केलं.

"भाजपवर विश्वास ठेवू नका. बाबरीला काहीच होणार नाही, असा सल्ला मी नरसिंह राव यांना बाबरी पडण्यापूर्वी दिला होता, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे. "पण आमच्याऐवजी नरसिंह राव यांनी भाजपवर विश्वास ठेवला," असे पवार यांनी सांगितले.

'भाजपवर विश्वास ठेवू नका' 'त्या' बैठकीबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा
Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप

पुढे ते म्हणाले की, मंत्र्यांचा एक गट होता, मी त्या गटाचा सदस्य होतो. या बैठकीत विजया राजे सिंधिया म्हणाल्या होत्या की, बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, विजया राजे म्हणाल्या होत्या की, त्या आवश्यक ती सर्व पावलं उचलतील आणि पण यासंदर्भात पंतप्रधानांनी कठोर पावलं उचलू नयेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com