धंगेकरांना यश मिळेल याची मला स्वतःला खात्री नव्हती - शरद पवार

धंगेकरांना यश मिळेल याची मला स्वतःला खात्री नव्हती - शरद पवार

कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.

कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं. आहे.

शरद पवार म्हणाले की, कसबा पेठ भाजपचा गड आहे. भाजपचा हा पराभव हा खासदार गिरीश बापट आणि टिळकांना डावलून घेतलेल्या निर्णयामुळे झाला. माझा प्रयत्न राहील की विधानसभा आणि लोकसभेसाठी तिन्ही पक्ष एकत्र राहतील. असे पवार म्हणाले.

यासोबत धंगेकर यांच्याविषयी पवार म्हणाले की, “रवींद्र धंगेकरांना यश मिळेल याची मला स्वतःला खात्री नव्हती, धंगेकरांना यश मिळेल असं लोकांकडून ऐकायला मिळत होतं. पण माझ्या मनात शंका होती.हा उमेदवार चार चाकीमध्ये फिरणारा नाही तर हा उमेदवार दुचाकीवर फिरणारा आहे म्हणून दोन पायाची लोकं याला मतदान करतील हे माहित होते. असे शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com