ताज्या बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन; दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन
आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे तसेच महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
वर्धापन दिनानिमित्त मुंबईत पक्षाच्या मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आज दुपारी 12 वाजता वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.