Jayant Patil on Chhagan Bhujbal : 'सरकारला नाशिकमध्ये भुजबळांनाच पालकमंत्री करावं लागेल'; जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य

जयंत पाटील यांनीदेखील छगन भुजबळांच्या मंत्रिपदाच्या शपथविधिवर भाष्य केले आहे.
Published by :
Rashmi Mane

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज, मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला. दरम्यान, त्यांच्या मंत्रिपदावरून विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांनीदेखील छगन भुजबळांच्या मंत्रिपदाच्या शपथविधिवर भाष्य केले आहे. सरकारच्या मंंत्रिमंडळाला अनुभवी नेता मिळाला, असे त्यांनी म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, "छगन भुजबळ यांना कामाची संधी मिळाली, हे चांगल झालं. त्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्यात आलेल. आता त्यांना घेण्यात आल आहे. नक्कीच भुजबळांना आनंद झाला असेल. भुजबळ हे अनुभवी आहेत, आणि अनुभवी लोकांची मंत्रिमंडळाला गरज आहे. त्यासाठीच त्यांना घेतलं असेल असं मला वाटतंय. रायगड आणि नाशिक हे दोन्ही मोठे जिल्हे आहेत. अजून या जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेला नाही. येत्या काळात कुंभमेळादेखील नाशिकमध्ये होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे निर्णय लवकर घ्यायला हवे होते. नेमकं याच जिल्ह्याचा निर्णय सरकारने प्रलंबित ठेवला. भुजबळांसारखा सिनियर माणूस तिथं आल्यावर, मला वाटतं त्यांनाच सरकारला तिथं पालकमंत्री करावं लागेल, असा अंदाज आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com