नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या महिल्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, प्रकृती गंभीर

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या महिल्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, प्रकृती गंभीर

राष्ट्रवादीच्या नेत्या डॉक्टर प्राची पवार यांच्यावर अज्ञात लोकांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या डॉक्टर प्राची पवार यांच्यावर अज्ञात लोकांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. प्राची पवार या माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी नेते वसंत पवार यांची कन्या आहे. हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला

नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवर्धन परिसरात डॉ. प्राची पवार आपल्या फार्म हाऊसवर इनोव्हा या चारचाकीने गेल्या होत्या. यावेळी फार्म हाऊसच्या प्रवेशद्वारावर दुचाकी लावलेली त्यांना दिसली. दुचाकी बाजूला घ्या असं त्यांनी सांगितलं. परंतु याचा राग आल्याने अज्ञात तीन ते चार जणांच्या टोळक्यातील एकाने चालकाच्या सीटवर बसलेल्या प्राची यांच्या हातावर दोन ते तीन ठिकाणी धारदार शस्त्राने वार केले. प्राची पवार यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्राची पवार यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्यामगील नक्की कारण आणि आरोपींचा शोध अद्याप लागलेला नसून नाशिक ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com