अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर

अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीची पत्रकार परिषद पार पडली.
Published by :
shweta walge

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना उमदेवारी देण्यात आली आहे. या बैठकीत तटकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला.

ते म्हणाले की, जागावटपाच 99 टक्के काम पूर्ण झालं आहे. इतर जागांवर 28 मार्चला घोषणा होईल.महायुतीत कोणतेही गैरसमज नाही. 28 तारखेला महायुतीच सर्व चित्र स्पष्ट होईल. मंत्री आणि आमदारांकडे प्रचाराची जबाबदारी सोपवली. राष्ट्रवादीच्या कार्यकत्याचं समाधान होईल अशा जागा महायुतीकडे मागितल्या. शिरुरची जागा पक्षप्रवेशानंतर जाहीर होईल.

काही काळ बारामतीचं सस्पेन्स ठेवतो, बारामतीत तुमच्या मनातलं नाव समोर येईल बारामतीत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांनी सूचक वक्तव्य देखील केलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com