Ajit Pawar : NCP चा पुण्यासाठी जाहीरनामा जाहीर; अजित पवारांचं ‘मोफत मेट्रो’ गेमचेंजर आश्वासन

Ajit Pawar : NCP चा पुण्यासाठी जाहीरनामा जाहीर; अजित पवारांचं ‘मोफत मेट्रो’ गेमचेंजर आश्वासन

पुणे महानगरपालिकेसाठी अजितदादांनी लोकप्रिय लाडकी बहीण योजनेला मागे टाकणारी घोषणा केली आहे. आमच्या ताब्यात महापालिका दिली तर, मी मोफत मेट्रो हे करून दाखवीन, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

पुणे महानगरपालिकेसाठी अजितदादांनी लोकप्रिय लाडकी बहीण योजनेला मागे टाकणारी घोषणा केली आहे. आमच्या ताब्यात महापालिका दिली तर, मी मोफत मेट्रो हे करून दाखवीन, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे. आज (दि.10) पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा पुणेकरांसाठी प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

आम्हाला पुणेकरांबद्दल जिव्हाळा आम्ही पुण्यात राहतो. त्यामुळे आम्हाला पुणेकरांबद्दल जिव्हाळा आहे. इतर बाहेरचे कोणी आले तर तेवढ्यापुरतेच येतील. त्यामुळे आम्हालाच संधी द्या, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. सहा महिन्यांचे सखोल सर्वेक्षण, प्रभागनिहाय संवाद आणि जनसंवाद मोहिमेतून तयार झालेल्या या जाहीरनाम्याने पुणेकरांच्या अपेक्षा आणि स्थानिक समस्यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे

  • दररोज पाणीपुरवठा: 41 प्रभागांत उच्च दाबाने नियोजित पाणी, टँकरमुक्त पुणे.

  • वाहतूककोंडीमुक्त शहर: अपूर्ण लिंक रस्त्यांची जोडणी, 150 किमी रस्त्यांचा दर्जा सुधारणा.

  • स्वच्छतेचा विज्ञाननिष्ठ आराखडा: 100% कचरा वर्गीकरण; 2029 पर्यंत ‘स्वच्छ सर्वेक्षण’ टॉप-3 लक्ष्य.

  • हाय-टेक आरोग्य सेवा: 200 ‘राजमाता जिजाऊ क्लिनिक’, टेलिमेडिसिन व PPP तपासण्या.

  • प्रदूषणमुक्त पुणे: पूर नियंत्रण, हरित विस्तार व हवामान-सज्ज शाश्वत विकास.

  • झोपडपट्टी पुनर्वसन: मूळ जागेवर पुनर्वसन, पारदर्शक प्रक्रिया.

  • जबाबदार प्रशासन: मोफत मेट्रो-बस, मालमत्ता कर सवलत, विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट.

  • पुणे मॉडेल शाळा: 150 आधुनिक शाळा, CBSE/ICSE दर्जा, पालकांवर अतिरिक्त भार नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com