एका बाईसाठी नेहरुंनी देशाची फाळणी केली; सावरकरांचे नातू रणजीत यांचा आरोप

एका बाईसाठी नेहरुंनी देशाची फाळणी केली; सावरकरांचे नातू रणजीत यांचा आरोप

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी नेहरुंवर गंभीर आरोप केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी एका बाईसाठी भारताची फाळणी केली तसेच नेहरूंनी 12 वर्षे भारताची गुप्त माहिती इंग्रजांना दिले. असे गंभीर आरोप रणजीत सावरकर यांनी नेहरुंवर केले आहेत.

पंडित नेहरूंनीच माउंटबॅटन यांना व्हाईसरॉय म्हणून नियुक्त केले होते, यावेळी बलवंत सिंह म्हणाले होते की, व्हाईसरॉय असल्याने ते पाकिस्तानात सैन्य पाठवू शकत नाही. यादरम्यान 20 हजार भारतीय तरुणींचे अपहरण करत त्यांना पाकिस्तान ठेवण्यात आले होते. यावेळी माउंटबॅटन यांनी लिहिले की, भारतीय नेत्यांना हे हत्याकांड पाहून काय करावे हे समजत नाही, म्हणून मी ताबा घेतला. यावेळी माउंटबॅटन यांनी असेही लिहिले की, माउंटबॅटनने भारत सोडल्यानंतर नेहरूंनी त्यांना 12 वर्षे दररोज त्यांचे अहवाल पाठवले. जे गुप्तचर यंत्रणांचे मोठे अपयश आहे. तसेच ज्या नेत्याला आपण चाचा नेहरू म्हणतो त्यांनी देशाचा विश्वासघात कसा केला हे संपूर्ण देशाला कळेल. पंडित नेहरू 9 मे ते 12 मे 1947 या काळात एकटेच शिमल्याला गेले होते. चार दिवस ते कुटुंबासह तेथेच राहिले. एडविना यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेल्या पत्रात पंडित नेहरूंना माझे पाहुणे म्हणून निमंत्रित केल्याचा उल्लेख आहे. तसेच ते खूप व्यस्त असल्याने नर्व्हस ब्रेक डाउन जवळ येत आहे. त्यांनी माझ्यासोबच चार दिवस घालवले आणि ते माझे चांगले मित्र झाले आहे. असे ते म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली होती. ते 12 वर्षे भारताची गुप्त माहिती इंग्रजांना देत होते. पंडित नेहरू आमि एडविवा यांच्यातील पत्रव्यवहार ब्रिटीशांकडून मागवून तो जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली

एका बाईसाठी नेहरुंनी देशाची फाळणी केली; सावरकरांचे नातू रणजीत यांचा आरोप
..तर हिंदुस्तानचा पाकिस्तान होण्यास वेळ लागला नसता - संजय राऊत
Lokshahi Marathi
www.lokshahi.com