Delhi Blast : दिल्ली स्फोटाचे नवीन CCTV फुटेज समोर; 40 फूट जमिनीखालील मेट्रो स्टेशन हादरले
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Delhi Blast ) नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक गाड्यांना आग लागली. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या दुकानांच्या काचाही फुटल्या.
या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले. लाल किल्ला परिसरात मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे.या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. या घटनेचं नवीन CCTV फुटेज समोर आलं आहे.
हा व्हिडिओ लाल किल्ला भूमिगत मेट्रो स्टेशनचा असून फुटेजमध्ये सुमारे 40 फूट खाली असलेलं मेट्रो स्टेशन हादरल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, फूड स्टॉलचा काउंटरही हादरला तसेच माणसं घाबरुन पळू लागल्याचे पाहायला मिळत आहे.
Summery
दिल्ली स्फोटाचे नवीन CCTV फुटेज समोर
40 फूट जमिनीखालील मेट्रो स्टेशन हादरले
हरियाणाच्या नूह येथून स्फोटकांची खरेदी केल्याचं समोर
