Wardha : वर्ध्यात हातातोंडांशी आलेला घास हिरवला! शेतकऱ्यांना एकएक संकटाचा सामना
भूपेश बारंगे,वर्धा : विदर्भात नगदी पिकं ओळखला जाणाऱ्या सोयाबीन पूर्णतः मातीमोल झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. जिल्ह्यात सोयाबीन पिकं मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. सोयाबीन पिकं शेतकऱ्याच नगदी पिकं म्हणून ओळखलं जात. दिवाळी सारखा मोठा सण शेतकऱ्याचा अंधारात जाण्याची वेळ यावर्षी आली आहे. याच कारण तसच आहे. शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करणारी सोयाबीन पिकच हातातून गेल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.दिवाळी पूर्वी काढणीला येणारी सोयाबीन पूर्णतः मातीमोल झाल्याने शेतकरी दिवाळी साजरी करायचं कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
कारंजा तालुक्यातील गवंडी येथील योगेश मानमोडे यांच्याकडे पाच एकर शेती आहे. यामध्ये सोयाबीन पिकं पेरणी केली आहे. जवळपास पेरणीपासून आतापर्यंत एक लाख खर्च केला आहे. सोयाबीन मधून मोठं उत्पन्न होईल या आशेत शेतकरी असताना त्यावर पाणी फेरलं आहे. पहिले येलो मोजॅक रोगाचा पादुर्भाव सोयाबीन वर आलं. त्यात अतिपावसामुळे सोयाबीन पूर्णतः नुकसान झालं. सोयाबीन पिकाला काही भरल्या नाहीं तर काही भरल्या त्यातून चक्क सोयाबीन शेंगातून बी अंकुरले जात असल्याने शेतकऱ्यावर अस्मानी संकट आलं आहे.
सरकार ने शेतातील पिकांचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहे. शेतात पाहिजे तस उत्पन्न होत नसल्याने कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडल्यानंतर शेतकऱ्यांना दुसऱ्याची गुलामगिरी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. असं योगेश मानमोडे यांनी लोकशाही कडे व्यथा मांडली आहे.
सोयाबीन साठी लावलेला खर्च निघेना झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सचिन धोटे यांच्याकडे चार एकर शेत आहे. यात सोयाबीन आहे.मात्र यावर्षी सोयाबीन पिक पूर्णतः मातीमोल झाल्याने पेरलं तेवढं सोयाबीन होणार नसल्याची खंत शेतकरी करत आहे.काढणीला आलेली सोयाबीन शेंगा भरल्या नाहीं त्या पूर्ण पापला झाली असून काही शेंगा बारीक दाणे पण आले नाहीं तर काही सोयाबीनला झाडावर शेंगातुन बी अंकुरले जात आहे यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेला आहे.
दिवाळी सारखा सण शेतकऱ्याचा अंधारात जाण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. दरवर्षी शेतकऱ्यावर निसर्ग कोपत असल्याने शेतकऱ्यांनी कराव तरी काय असा प्रश्न शेतकरी करत आहे. एककिडे निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांच्या माथ्यावर येत असल्याने शेतकऱ्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. सरकारने तुटपुंजी मदत न करता भरीव मदत करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव दिल्यास शेतकरी कुठेतरी समाधानी होईल.