मुंबई महापालिकेचा नवा प्रकल्प; फक्त एक क्लिक अन् मिळवा तुमच्या इमारतीची सर्व माहिती

मुंबई महापालिकेचा नवा प्रकल्प; फक्त एक क्लिक अन् मिळवा तुमच्या इमारतीची सर्व माहिती

मुंबई महापालिकेने एक नवा प्रकल्पाची घोषणा केली आहे. फक्त एका क्लिकवर आता तुम्हाला तुमच्या इमारतीची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई महापालिकेने एक नवा प्रकल्पाची घोषणा केली आहे. फक्त एका क्लिकवर आता तुम्हाला तुमच्या इमारतीची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. मुंबई महापालिकेतर्फे नवी प्रणाली सुरु करण्यात आली आहे. 'इमारत ओळख क्रमांक' अर्थात 'मायबीएमसी बिल्डिंग आयडी' प्रकल्प सुरु करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांनी या प्रणालीचा शुभारंभ केला.

मुंबईत सुमारे दोन लाख 33 हजार मालमत्ता करपात्र इमारती आहेत. करसंकलनाच्या दृष्टीने यातील प्रत्येक इमारतीला 15 अंकी क्रमांक देण्यात आला आहे. हा प्रकल्प राबवत असताना, प्रशासनाच्या निदर्शनास आलं की, ज्याप्रमाणे मालमत्ता कर संकलनासाठी संदर्भ क्रमांक दिला आहे. प्रत्येक इमारतीला एकच मुख्य ओळख क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक इमारतीला एकच मुख्य ओळख क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला.

इमारतींना दिलेल्या वेगवेगळ्या परवानग्या आणि सुविधांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणाली एकाच मुख्य क्रमांकाखाली जोडण्याचं काम या प्रकल्पात पालिकेकडून करण्यात येणार आहे. इमारतींना दिलेल्या वेगवेगळ्या परवानग्या आणि सुविधांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणाली एकाच मुख्य क्रमांकाखाली जोडण्याचं काम या प्रकल्पात पालिकेकडून करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com