Railway Tickets : तत्काळ तिकिटांसाठी नवीन नियम लागू ; आधार ई-व्हेरिफिकेशन अनिवार्य

Railway Tickets : तत्काळ तिकिटांसाठी नवीन नियम लागू ; आधार ई-व्हेरिफिकेशन अनिवार्य

रेल्वेच्या नवीन नियमामुळे तत्काळ तिकीटांचा गैरवापर टळणार
Published by :
Shamal Sawant
Published on

भारतीय रेल्वेची (Tatkal tickets) सेवा देशभरात अनेक वर्षांपासून प्रवाशांना महत्त्वाची सुविधा देत आहे. रेल्वेने विविध मार्गांवर लोकांना जोडण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या विस्तृत नेटवर्कमुळे दररोज लाखो लोकांसाठी प्रवास सुलभ होतो. आता भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीटांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे यात सुधारणा होणार आहे.

तत्काळ तिकीट बुकिंगसाठी एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. आता, फक्त तेच लोक तत्काळ तिकीट बुक करू शकणार आहेत, ज्यांचा आधार कार्ड ई-ऑथेंटिकेशन पूर्ण झाला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयामुळे तत्काळ तिकीटांचा गैरवापर टाळण्यास मदत होईल, आणि खरे प्रवासी त्याचा योग्य वापर करू शकतील.

तत्काळ तिकीटांचा वापर मुख्यतः आपत्कालीन परिस्थितीत, तात्काळ प्रवास करण्यासाठी करण्यात येतो. यामुळे, कधी कधी जास्त पैसे देऊन प्रवास करणे शक्य होईल, परंतु याचा गैरवापर होऊन खऱ्या प्रवाशांना तिकीट मिळत नाही. आता, आधार कार्ड ई-व्हेरीफिकेशन पार पडलेल्या व्यक्तींनाच ऑनलाईन तत्काळ तिकीट बुक करण्याची सुविधा मिळणार आहे.

हे नियम रेल्वेच्या तत्काळ तिकीट प्रणालीला अधिक सुरक्षित आणि सुलभ बनविण्याचा उद्देश ठरवले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com