तर तुमचेही रेशनकार्ड होणार रद्द; सरकारचा नवा नियम
Admin

तर तुमचेही रेशनकार्ड होणार रद्द; सरकारचा नवा नियम

रेशनकार्डचे नवे नियम सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.

रेशनकार्डचे नवे नियम सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. नव्या सरकारी नियमानुसार जर रेशन कार्डधारकाने स्वत:हून कार्ड सरेंडर केलं नाही तर चौकशीनंतर त्याचं कार्ड रद्द केलं जाईल. तसेच त्याच्या कुटुंबीयांविरोधात कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर जेव्हापासून हे लोक रेशन घेत आहेत, तेव्हापासूनची त्यांच्याकडून भरपाईही केली जाणार आहे.

गावात वर्षाला दोन लाख आणि शहरात तीन लाखाहून अधिक पगार असेल अशा लोकांना त्यांचं रेशन कार्ड तहसील किंवा डीएसओ कार्यालयात सरेंडर करावं लागणार आहे. सरकारने या वर्षीही म्हणजे 2023मध्येही रेशन कार्डधारकांना मोफत रेशन देण्यात येणार असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. मात्र, अपात्र लोकही मोफत रेशनचा फायदा घेत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येत आहे.

अशा लोकांनी स्वत: आपलं रेशन कार्ड रद्द करावं जर लोकांनी स्वत:हून रेशन कार्ड रद्द नाही केलं तर तपासल्यानंतर अन्न पुरवठा विभागाची टीम रेशन कार्ड रद्द करणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com