राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या सभेचा नवा टिझर रिलीज
Admin

राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या सभेचा नवा टिझर रिलीज

राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या सभेचा नवा टिझर रिलीज करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या सभेचा नवा टिझर रिलीज करण्यात आला आहे. गुढी पाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ शिवतिर्थावर धडाडणार आहे. २२ मार्च रोजी राज ठाकरे सभा घेणार आहे. २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर सभा होणार आहे.

॥ ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व ॥, असे लिहित मनसेतर्फे हा टिझर ट्विट केला गेला आहे. राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या सभेचा नवा टिझरमध्ये मराठी, हिंदू आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर आहे. तसेच टिझरमध्ये हिंदू ही दोन अक्षरे जगा, मराठी या ३ अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे या पाच अक्षरे नेहमीच पाठीशी असतील. असे म्हटले आहे.

आता राज ठाकरे गुढीपाडव्याला काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com