कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे लवकरच उद्घाटन होणार - ज्योतिरादित्य शिंदे

कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे लवकरच उद्घाटन होणार - ज्योतिरादित्य शिंदे

भाजपच्या लोकसभा मतदारसंघ प्रवास योजनेचा एक भाग म्हणून ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजपच्या लोकसभा मतदारसंघ प्रवास योजनेचा एक भाग म्हणून ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते म्हणाले की, कोल्हापूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे काम पूर्ण करून लवकरच लोकार्पण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

हे. या मार्गावर विमान सेवा सुरु झाल्यास स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या उडान योजने अंतर्गत कोल्हापूर जयपूर ही विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

"लोक आनंदी होते. मला आनंद आहे की उड्डाणे नियमितपणे सुरु आहेत. लवकरच, आम्ही कोल्हापूर विमानतळावरील कामांचे उद्घाटन करु.” असे ते म्हणाले. अलिकडेच त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूर-बंगळूर-कोईम्बतूर विमानसेवेचे उद्घाटन केले. कोल्हापूर ते राज्याची राजधानी मुंबई दरम्यान नियमित विमानसेवेमुळे प्रवासी आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com