Beed Politics : परळीतील राजकारणात नवा ट्विस्ट; राष्ट्रवादी- शिवसेनेसोबतच्या युतीतून MIM ची माघार
बीडच्या परळीतील राजकारणात नवा ट्विस्ट राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटासोबत केलेल्या युतीतून एमआयएमची माघार...! नगरपरिषद गटनेते वैजनाथ सोळंके यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र...!
परळी नगर परिषदेत राजकीय घडामोडींना वेग आला असून एमआयएम पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट व मित्र पक्ष आघाडीला दिलेला पाठिंबा अखेर मागे घेतला आहे. एम आय एम ने केलेल्या या युतीमुळे बीडच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं होतं.. यामुळे आता एमआयएमच्या एकमेव नगरसेविका आयेशा मोहसीन शेख यांनी आपला पाठिंबा मागे घेतल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे गटनेते वैजनाथ सोळंके यांच्याकडे दिले आहे. तसेच हे पत्र जिल्हाधिकारी यांच्याकडेही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
थोडक्यात
परळीतील राजकारणात नवा ट्विस्ट
राष्ट्रवादी- शिवसेनेसोबतच्या युतीतून एमआयएमची माघार
MIM ने युतीला दिलेला पाठिंबा मागे घेतला
पाठिंबा मागे घेतल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

