सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्याला भक्तांची पसंती

सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्याला भक्तांची पसंती

आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज (31 डिसेंबर) 2022 या वर्षातील शेवटचा दिवस आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे. नववर्षाच्या स्वागतापूर्वी चालू वर्षाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षाच्या स्वागताचे सर्वांना वेध लागले आहे. कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईकर नववर्षाचे जोरदार आणि जल्लोषात साजरा करणार आहे.

याच पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी देवदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे.

हजारोंच्या संख्येनं पर्यटक आणि भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. यासाठी मंदिर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे.आज पहाटेपासूनच साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यासह देशभरातून लाखो आज शिर्डीत दाखल झाले आहेत. सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानं यांनी घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com