NIA ची कारवाई! दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाबमध्ये २० ठिकाणी छापे
Admin

NIA ची कारवाई! दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाबमध्ये २० ठिकाणी छापे

NIAकडून दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील २० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

NIAकडून दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमधील २० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गँगस्टर-दहशतवाद फंडिंग प्रकरणी आतापर्यंत दोन वेळा छापे टाकण्यात आले आहेत. याआधी एनआयएने दोन वेळा कारवाई करत १०२ ठिकाणी छापे टाकले होते.

लॉरेन्स बिष्णोई, नीरज बावना आणि टिल्लू ताजपुरिया यांच्यासह सहा गँगस्टर्सची चौकशी करण्यात आल्यानंतर हे छापे टाकले जात आहेत. गँगस्टर आणि दहशतवाद संबंधांचा तपास एनआयए करत असून त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

सहा गँगस्टर्सची चौकशी केल्यानंतर इतर अनेक गँगस्टर्सची नावं समोर आली आहेत. एनआयए चौकशी कऱण्यात आलेल्या गँगस्टर्सच्या घऱावर छापे टाकत असल्याचे समजते. गँगस्टर्सचे इतर देशांमध्येही संपर्क आहेत. लॉरेन्स बिष्णोई आणि बावना गँगच्या नावे भारतात दहशतवादासाठी मोठ्या प्रमाणात निधी पुरवला जात असल्याचं मिळालेल्या माहितीनुसार समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com