NIA
NIATeam Lokshahi

देशभरात धाडसत्र; टेरर फंडींग प्रकरणासंबंधी NIA, ATS ची मोठी कारवाई

महाराष्ट्रासह देशभरात छापे; सुमारे 200 ठिकाणी केली कारवाई

NIAने देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर छापेमारी केली आहे. देशभरात सुमारे 200 ठिकाणी ही छापेमारी झाली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावमध्ये छापेमारी केल्याचं वृत्त आहे.

एनआयएने मध्यरात्री तीन वाजता नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 23 मधील PFI च्या कार्यालयावर छापा मारला. तर, पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे.

NIA
आज मोदी-शिंदे भेट होण्याची शक्यता; वेदांता प्रकरणावर शिंदे पंतप्रधानांशी चर्चा करणार का?

पुण्यातील कोंढवा भागात PFI च्या कार्यालयामध्ये छापेमारी करून एनआयएने साहित्य जप्त करत दोघांना ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. तर, नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 23 मधील PFI च्या कार्यालयावर मध्यरात्री बाराच्या सुमारासच छापा मारत कारवाई केली आहे.

Lokshahi
www.lokshahi.com