ताज्या बातम्या
मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक
सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा लोकल सेवा बंद राहणार आहेत.
थोडक्यात
मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक असणार आहे.
कर्नाक उड्डाणपुलाच्या कामामुळे सीएसएमटी ते मस्जिद दरम्यान ब्लॉक असणार आहे.
25,26,27 जानेवारी आणि 1,2,3 फेब्रुवारीला हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कर्नाक उड्डाणपुलाच्या कामामुळे सीएसएमटी ते मस्जिद दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावरील लोकल सीएसएमटी ते भायखळा दरम्यान नसणार आहेत. तर, हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यान बंद राहणार आहेत.
25, 26, 27 जानेवारी आणि 1, 2, 3 फेब्रुवारीला हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून सीएसएमटी-भायखळा, सीएसएमटी-वडाळा लोकल सेवा बंद राहणार आहेत.