Thackeray Bandhu : "....ठाकरे जी से मिलूँगा" निशिकांत दुबेचा थेट चॅलेंज; ठाकरे बंधूंना बीएमसी निकालानंतर डिवचलं!
Nishikant Dubey On Thackeray Bandhu : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप–शिंदे गटाच्या युतीने मोठी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भाजपने दमदार कामगिरी करत बहुमताच्या जवळ पोहोचल्यामुळे मुंबईत सत्ताबदल अटळ मानला जातोय. तब्बल अनेक वर्षांनंतर शिवसेनेची पकड सैल झाल्याचं निकालांमधून स्पष्ट होत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर एक टोलेबाज संदेश टाकला आहे. “मी लवकरच मुंबईत येऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेईन,” असं त्यांनी लिहिलं असून, या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
मतमोजणी पूर्ण व्हायची असली तरी प्राथमिक कल भाजपच्या बाजूने झुकलेले दिसत आहेत. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांत भाजपची सरशी होत असल्याने पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. दुबे यांच्या पोस्टकडे ठाकरे बंधूंवरील अप्रत्यक्ष टीका म्हणून पाहिलं जात असून, जुन्या वादाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.

