दिल्ली पुन्हा हादरली: श्रद्धा वालकरप्रमाणेच आणखी एका तरुणीची हत्या; फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह अन् संध्याकाळी केलं दुसरीशीच लग्न
Admin

दिल्ली पुन्हा हादरली: श्रद्धा वालकरप्रमाणेच आणखी एका तरुणीची हत्या; फ्रिजमध्ये ठेवला मृतदेह अन् संध्याकाळी केलं दुसरीशीच लग्न

दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे.

दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. श्रद्धा वालकरप्रमाणेच आणखी एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे. दिल्लीतील बाबा हरिदास नगर परिसरातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 22 वर्षीय निक्की यादवची तिच्या बॉयफ्रेंडने हत्या केली, त्यानंतर तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला आणि त्याच दिवशी संध्याकाळी त्यानं दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केलं. साहिल गहलोत आणि निक्की यादव लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी साहिलला अटक केली आहे.

त्यानंतर तिचा मृतदेह गाडीतच घेऊन तो बराच वेळ फिरत होता. त्यानंतर बाबा हरिदास नगर परिसरातील त्याच्या ढाब्यावर जाऊन निक्कीचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. निक्कीला साहिलसोबत लग्न करायचं होतं, पण साहिलचे कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. साहिलला कुटुंबीयांच्या विरोधात जायचं नव्हतं. त्यामुळे त्यानं दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करायचं ठरवलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ढाब्यावर धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी साहिल गेहलोत याला अटक करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com