Nilesh Lanke : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर निलेश लंके यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Nilesh Lanke : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर निलेश लंके यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी हांगे या गावात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी संवाद साधताना निलेश लंके म्हणाले की, ज्या माझ्या राजकीय कालखंडामध्ये प्रत्येक निवडणूक मी एकदाच लढवली आणि ती जिंकून आलेलो आहे. माझ्या राजकीय कालखंडामध्ये पहिल्या दिवसांपासून जे माझे सहकारी असो, माझे सर्व जेष्ठ मंडळींनी मला जो आधार दिला. मायेची थाप माझ्या पाठीवर नेहमी ठेवली. राजकारणामध्ये आपण किती मोठे झालो यापेक्षा आपला पाया म्हणून ज्यांनी काम केलं अडचणीच्या काळात ही सगळी मंडळी आज माझ्याबरोबर आहे. मला खात्री आणि विश्वास आहे की ही लोकसभेची निवडणूक मी निश्चित अतिशय चांगल्या मताच्या फरकाने निवडून येणार.

यासोबतच ते म्हणाले की, जनतेमध्ये सहभाग काय आहे. जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली तर परिवर्तन हे अटळ असते. माझ्या प्रत्येक निवडणुका या ज्यांना राजकीय वारसा आहे, वारसदारांच्या विरोधातच निवडणुका लढवल्या आहेत. पण या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने या सगळ्याच्या सगळ्या निवडणूका आजपर्यंत मी जिंकून आलेलो आहे. त्यामुळे ही निवडणूकसुद्धा सर्वसामान्य मायबाप जनेतेच्या आशीर्वादाने ही निवडणूक मी निश्चित निवडूनच येणार.

निवडणूक सुरु झाल्यानंतर या निवडणुकीचं चित्र आहे. धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती. यांनी प्रत्येक ठिकाणी धनशक्तीचा आणि बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघाने आतापर्यंतच्या राजकीय कालखंडामध्ये कधी इतका पैशाचा पाऊस पाहिला नसेल एवढा अमाप पैशाचा पाऊस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला. असे निलेश लंके म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com