'35 मिनिटं उद्धव ठाकरे कारमधून उतरले नाहीत' निलेश राणेंचा हल्लाबोल
चेंबूर टिळक नगर येथे भाजपचे सचिव अमित सातार्डेकर यांच्या वतीने आयोजित दीपोत्सवाला राणे पिता पुत्रांनी हजेरी लावली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी या उत्सवाला उपस्थित राहून चेंबुरवासियांना शुभेच्छा दिल्या.
बोलताना निलेश राणे यांनी दरवर्षी आम्ही इथे येत असतो. फार मेहनतीने हा उत्सव साजरा केला जात असल्याने आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यास येत असतो. पूर्वीचे टिळक नगर आणि आताचे टिळक नगर फार वेगळे आहे. पण संस्कृती जपन्याचा वारसा चालवत असल्याचे निलेश राणे म्हणाले. तर आयोजक अमित सातार्डेकर यांनी सर्व लोक मरीन लाईन किंवा शिवाजी पार्कला जातात परंतु इथल्या लोकांना इथेच दीपोत्सव पाहायला मिळवा म्हणून हे आयोजन करीत असल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरेंवर निशाणा
एक शाखा वाचवायला पक्ष प्रमुखाला जावे लागते हे दुर्दैव आहे. त्या शाखेचे भाडे शिंदे साहेब भरत होते. नूतनीकरण ते करत होते. ३५ मिनिट उद्भव ठाकरे गाडीतून उतरले नाही. बुलेट प्रूफ गाडीत घाबरले. त्या शाखेचे नूतनीकरण होते त्यांनी तिथे जायला नव्हते पाहिजे. उद्भव ठाकरेना शिवसेना कळलीच नाही.
बाहेर येऊन वाघ आहे म्हणायचे जिथे दाखवायचे तिथे नाही दाखवले. पाच किमी लांब जाऊन वाघ बोलायचे नव्हते. न बघताच गेले.उद्भव ठाकरे फेल गेलेत, त्यांच्याकडे कार्यकर्ता राहिलेला नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, मुंबईत शिंदे गटाकडून जमीनदोस्त करण्यात आलेल्या ठाण्यातील मुंब्रा येथील शाखेजवळ शनिवारी उद्धव ठाकरे पोहोचताच शिंदे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे लावलेले बॅनर फाडल्याने वाद आणखीनच चिघळला होता. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना शाखेच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.