किती वर्षे उद्धव ठाकरेंची तुम्ही भांडी घासणार आहात; विनायक राऊतांच्या आरोपावर निलेश राणेंचे प्रतिउत्तर

किती वर्षे उद्धव ठाकरेंची तुम्ही भांडी घासणार आहात; विनायक राऊतांच्या आरोपावर निलेश राणेंचे प्रतिउत्तर

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे.

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू प्रकरणी विनायक राऊत वारीसे कुटुंबीयांच्या भेटीला गेले होते. विनायक राऊत यांनी राणेंवर आरोप केले आहेत की, या प्रकरणात ज्या आरोपीला अटक झाली आहे तो आरोपी राणेंच्या जवळ होता.

यावर प्रतिउत्तर देत निलेश राणे यांनी व्हिडिओ ट्विट करत दिले आहे. व्हिडिओत निलेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी ऊठसूट नारायण राणे यांच्यावर आरोप करणे राउत यांनी बंद करावेत. राऊत यांनी आरोप करण्याऐवजी खासदार या दर्जेदार पदाला शोभतील अशी दर्जेदार कामे करावीत, असा खोचक सल्लाही निलेश राणे यांनी दिला आहे.

तसेच राजन साळवी या ठाकरे गटाच्या आमदारांसोबत संबंधित आरोपी दीड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात काय करत होता?, तसेच रिफायनरी संबंधित बैठकांमध्येही संबंधित आरोपी साळवी यांच्यासोबत दिसला आहे. त्यावर खुलासा करण्याचे आव्हान राणे यांनी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com