Kalyan police
Kalyan policeteam lokshahi

फक्त आम्हीच नाही तर इतरही बाईक चोरतात, खुलाशाने नऊ बाईक चोर पोलिसांच्या जाळ्यात

चोरी फक्त आम्ही करत नाही इतरही करतात

Kalyan police : कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी वाहन चोरीच्या पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एक दोन नाही तर नऊ वाहन चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 9 मोटारसायकल, एक रिक्षा आणि चोरीस गेलेल्या काही बॅटरीज जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी एका चोराला गस्त घालताना पकडले. या चोरटय़ाने दुसऱ्या चोरटय़ाचे नाव सांगितले. दुसऱ्याने तिसऱ्याचे नाव सांगितले. असे करुन एक एक करुन नऊ चोरटे पकडले गेले. चोरी फक्त आम्ही नाही करत इतरही करतात. फक्त या खुलाशावर नऊ चोरटे गजाआड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Nine bike thieves in Kalyan police's net)

Kalyan police
TVS घेऊन येतेय धासू इलेक्ट्रिक स्कूटी, सिंगल चार्जमध्ये उत्तम मायलेज

कल्याण डोंबिवलीत वाहन चोरीचे अनेक गुन्हे घडले आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस देखील चोरटयांच्या शोधात होती. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी विशेष तपास पथके नेमली होती. डिसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची शोध मोहिम सुरु झाली. एका दिवशी पोलिस अधिकारी हरीदास बोचरे यांच्या पथकाने एका बाईक चोरटय़ाला ताब्यात घेतले.

Kalyan police
27 गावातील पाणी प्रश्न मार्गी लावणार, कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाणांची ग्वाही

भावेश कुंड असे या चोरटय़ाचे नाव आहे. पोलिसांनी त्याचा साथीदार आकाश महर याला सुद्धा अटक केली. त्यांच्याकडून एक बाईक जप्त करण्यात आली. मात्र या दोघांनी पकडले गेल्यानंतर जे उघडीस आणले. ते ऐकून पोलिसही हैराण होते. चोरी फक्त आम्ही नाही तर तुम्हाला इतर चोरटय़ांचे नाव पत्ते देतो असे सांगून काही चोरटय़ांनी नावे सागितली. त्या चोरटय़ांनी आणखीन काही चोरटय़ांची नावे सांगितली. असे करत पोलिसांनी नऊ चोरटय़ांना अटक केली आहे. इतर सात अटक आरोपींची नावे जतीन अजेंद्र, क्रीष अन्थोनी, सतीश लोंढे, मंगेश डोंगरे, अविनाश चिकणो, मितेश पंडीत आणि गणेश ससाणे अशी आहेत. यांच्याकडून नऊ मोटार बाईक जप्त केल्या आहेत. अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com