उद्धव ठाकरेंसह देशातील नऊ विरोधी पक्षांच्या नेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

उद्धव ठाकरेंसह देशातील नऊ विरोधी पक्षांच्या नेत्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा निषेध करत उद्धव ठाकरेंसह देशातील नऊ विरोधी पक्षातील नेत्यांचे मोदींना पत्र लिहले आहे

आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईचा निषेध करत उद्धव ठाकरेंसह देशातील नऊ विरोधी पक्षातील नेत्यांचे मोदींना पत्र लिहले आहे. तसेच तपास यंत्रणांचा वापर करत विरोधकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला आहे.

मनीष सिसोदिया यांची कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने चौकशी केल्यानंतर त्यांना २६ फेब्रुवारी २०२३ रोजी अटक करण्यात आली. मात्र, कोणतेही पुरावे नसताना तसेच खोटे आरोप लावून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर झालेली कारवाई राजकीय असल्याचे दिसून आले.

देशात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्या पासून विरोधी पक्षांतील नेत्यांवर कारवाईच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेकांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. ज्या विरोधी पक्षांतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यापैकी ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांवर नंतर कोणतीही कारवाई झाली नाही. ज्यामध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, मुकूल रॉय, सुवेंदी अधिकारी, नारायण राणे यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे", असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. तसेच देशाने हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केल्याचेही त्यांनी या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणाऱ्या नऊ विरोधी पक्षातील नेत्यामध्ये, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (आप), तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (बीआरएस), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी (तृणमूल कांगेस), पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (आप), तेजस्वी यादव (राजद), फारूक अब्दुल्ला (जेकेएनसी), शरद पवार (एनसीपी), उद्धव ठाकरे (शिवसेना, यूबीटी) आणि अखिलेश यादव (सपा) यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com