रायगडच्या माणगावमध्ये निकालाआधीच निरंजन डावखरे यांच्या विजयाचे बॅनर

रायगडच्या माणगावमध्ये निकालाआधीच निरंजन डावखरे यांच्या विजयाचे बॅनर

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी पार पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारत गोरेगावकर, रायगड

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी पार पडणार आहे. 26 जूनला मतदान झालं होते आणि आज ही मतमोजणी पार पडणार आहे. यात कोणाचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उच्चशिक्षित मतदारांचा कौल नेमका कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. अनिल परब, निरंजन डावखरे, किरण शेलारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षकसाठी मतमोजणी सुरु झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रायगडच्या माणगावमध्ये निकालाआधीच निरंजन डावखरे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहे. निकालाआधीच बॅनर लागल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. भाजप जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरेंनी हे बॅनर लावल्याची माहिती मिळत आहे.

निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आहेत. एकूण 13 उमेदवार रिंगणात असून महायुतीचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे रमेश कीर यांच्यात लढत होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com