विनायक राऊत खासदार आहे की आमचे ऑफिसबॉय? - आमदार नितेश राणे

विनायक राऊत खासदार आहे की आमचे ऑफिसबॉय? - आमदार नितेश राणे

विनायक राऊत आणि नितेश राणे हे एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात.

विनायक राऊत आणि नितेश राणे हे एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात. नारायण राणे यांच्या खासगी सचिवाने अनेकांना गंडा घातल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राणेंच्या खासगी सचिवाला दम दिला होता. असे विनायक राऊत म्हणाले होते.

यातच आता नितेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले की, पहिल्यांदा विनायक राऊत यांनी आपले संबंध उद्धव ठाकरेंशी चांगले ठेवावे कारण विनायक राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटण्यासाठी कधी, केव्हा आणी कसे प्रयत्न करत आहेत हे जर मी सांगितल तर विनायक राऊत यांचे उरले सुरले कपडे राहणार नाहीत. विनायक राऊत यांनी नरेंद्र मोदी, नारायण राणे ही मोठी मोठी नावे घेवू नये. जेवढी आपली लायकी आहे तेवढच त्यांनी बोलावं असे नितेश राणे म्हणाले.

यासोबतच विनायक राऊत खासदार आहेत की नारायण राणेंच्या ऑफिसमधील चहा देणारे ऑफिसबॉय असा सवाल उपस्थित केला आहे. नारायण राणेंचे नरेंद्र मोदी यांच्या बरोबर कसे संबंध आहेत याची चिंता विनायक राऊत यांनी करू नये. असे म्हणत राऊतांवर नितेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com