उद्धव ठाकरेंवर टीका करत नितेश राणेंचा मोठा दावा; म्हणाले, लवकरच आदित्य ठाकरे...

उद्धव ठाकरेंवर टीका करत नितेश राणेंचा मोठा दावा; म्हणाले, लवकरच आदित्य ठाकरे...

ठाकरे कुटुंब काल दुपारी 1 वाजता डेहराडूनला रवाना झाला, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी यांनी ट्वीटद्वारे केला आहे.
Published by :
shweta walge
Published on

ठाकरे कुटुंब काल दुपारी 1 वाजता डेहराडूनला रवाना झाला, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी यांनी ट्वीटद्वारे केला आहे. त्यावर जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही? हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस पक्षाच्या प्रचारासाठी छत्तीसगढ दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावरुनच आता नितेश राणेंनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ठाकरे कुटुंब काल दुपारी 1 वाजता डेहराडूनला रवाना झाले आहे. हीच का तुमची मराठा आरक्षणाची काळजी? जरांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत तुम्हाला थांबता आले नाही, असा सवाल नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना केला. देवेंद्र फडणवीस पक्षाच्या कामासाठी गेले होते, कौटुंबिक सहलीसाठी गेले नव्हते असे म्हणत नितेश राणेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना काही दिवसांत अटक होणार आहे. यामुळे उद्धव ठाकरे बिथरले आहेत, असा मोठा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. आज पुन्हा नितेश राणेंनी आदित्य ठाकरेचे नाव न घेता डिवचले आहे. नितेश राणे म्हणाले, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात लवकरच बेबी पेंग्विनला प्रकरणात अटकेची शक्यता आहे.

दसरा मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे देश सोडून जाणार आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी आदित्य हे पाऊल उचलणार आहेत असेही राणे म्हटले होते. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com