Sindhudurg : कोकणाचा आवाज, वजन मंत्रिमंडळामध्ये वाढतं आहे - नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणतात, 'कोकणाचा आवाज मंत्रिमंडळात वाढत आहे'. 'कोकण सन्मान 2025' सोहळ्यात त्यांनी कोकणाच्या विकासाचे महत्त्व सांगितले.
Published by :
Team Lokshahi

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबीनेट मंत्री नितेश यांच्या संकल्पनेतून 'कोकण सन्मान सोहळा' मागील दोन वर्षापासून आयोजित केला जात आहे. कोकणातील डिजिटल निर्मात्यांना सन्मानित करणारा प्रतिष्ठित 'कोकण सन्मान 2025' हा सोहळा देवगडमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे माध्यमांशी संवाद साधला.

नितेश राणे म्हणाले की, "कोकणच्या मातीचे दर्शन जगाला झालं पाहिजे. कोकण किती निसर्गरम्य आहे यांची माहिती जास्तीत लोकांपर्यत पोहचावी असा आमचा प्रयत्न आहे. पर्यटनाच्या दृष्टीने किंवा रोजगारासाठी कोकण किती महत्त्वाचे आहे. तसेच क्रियेट्ससाठी हक्काचे व्यासपीठ असावे असा आमचा हेतू होता. या सन्मान सोहळ्याला जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने आमचा हेतू खरा होत असल्याचे दिसत आहे." असे, कॅबीनेट मंत्री नितेश राणे म्हणाले आहे.

मंत्रिमंडळात कोकणाच वजन वाढत आहे.

"कोकणातले असंख्य लोक मंत्रिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. कोकणाचा आवाज, वजन मंत्रिमंडळामध्ये वाढत असल्याने हा उल्लेख मी मुद्दाम केला आहे. 'कोकणाचा विकास थांबवणे आता शक्य नाही' हे सांगण्यासाठी हा उल्लेख केला होता." असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com