नितेश राणेंच्या ट्विटमुळे खळबळ; म्हणाले, अमरावती प्रमाने अजून एका हिंदूवर अन्याय, उद्या...

नितेश राणेंच्या ट्विटमुळे खळबळ; म्हणाले, अमरावती प्रमाने अजून एका हिंदूवर अन्याय, उद्या...

नितेश राणे उद्या दुपारी 1 वाजता नरिमन पॉईंट येथील कार्यालयातून नितेश राणे काय खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

अमरावतीमधील उमेश कोल्हे प्रकरणानंतर महाराष्ट्रात आणखी एका हिंदूवर हल्ला झाला. उद्या पत्रकार परिषदेत आम्ही याबद्दल अधिक माहिती देऊ असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी उमेश कोल्हे यांचं हत्या प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला होता. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर भाजपने गंभीर आरोप केले होते. आता नितेश राणेंनी याबद्दल ट्विट केलं असून, उद्या आम्ही याबद्दल अधिक तपशील देऊ असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्या दुपारी 1 वाजता नरिमन पॉईंट येथील कार्यालयातून नितेश राणे काय खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

अमरावती जिल्ह्यातील उमेश कोल्हे खून प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केलेल्या आणखी दोन आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने आरोपी मुशफिक अहमद आणि अब्दुल अरबाज या दोघांना 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडीत पाठवलं आहे. या दोन्ही आरोपींना एनआयएने अमरावती मधूनच अटक केली आहे. या दोन आरोपींसह एनआयएने आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. 21 जून रोजी उमेश कोल्हे मेडिकलमधून परतत असताना दोघांनी त्याचा गळा चिरून खून केला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com