पुढची सभा मंगल कार्यालयातच घ्यावी लागेल; नितेश राणे यांची टीका
Admin

पुढची सभा मंगल कार्यालयातच घ्यावी लागेल; नितेश राणे यांची टीका

वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Published by :
Siddhi Naringrekar

वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील बीकेसी मैदानावर ही सभा पार पडली. या सभेवर आता अनेकांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता नितेश राणे यांनी टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले की, अदानींचं चरित्र लिहिण्यापेक्षा उद्धव ठाकरे तुमचं चरित्र लिहा. तुमचं इन्कम कुठून येतं? कोणतीही कंपनी नाही मग एवढं पैसे कुठून येतात? हे मराठी तरुणांना कळू द्या. उगाच मोहित कंबोजच्या नादाला लागू नकोस. आदित्य आणि तेजस यांचं नाईट लाईफ समोर येईल. असे नितेश राणे म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, कालच्या सभेत मुस्लिम बांधवाना टोप्या काढायला लावल्या होत्या. उद्धव ठाकरेंच हेच हिंदुत्व आहे का?माझ्याकडे अजून बरीच माहिती आहे. ती लवकरच बाहेर काढेन.उद्धव ठाकरेंनी काल जी सभा घेतली ती पाहता, पुढची सभा मंगल कार्यालयात घ्यावी लागेल. असे नितेश राणे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com