संजय राऊत हे मुस्लिम लीगचे प्रवक्ते - नितेश राणे

संजय राऊत हे मुस्लिम लीगचे प्रवक्ते - नितेश राणे

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून काही मुस्लिम मंडळीने चादर चढवण्याचा प्रयत्न केला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून काही मुस्लिम मंडळीने चादर चढवण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत प्रतिक्रिया दिली की, "मंदिरात कुणी घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं. काही जण मंदीराच्या परिससरात धूप दाखवून जात होते. असे ते म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मंदीर परिसरात मांसाहाराची दुकाने कशी चालतात. राज्य अस्थिर करणाच्या प्रयत्न राऊत करतात. महाराष्ट्रात दंगल कशी घडवायची, कुठे घडवायची? रझा अकादमीसाऱख्या लोकांना हाताला धरून, प्रयत्न ठाकरे गट करत आहे. मुस्लिम समाजाच्या राऊत प्रेमात आहे. संजय राऊत हे मुस्लीम लीगचे प्रवक्ते आहेत. असे नितेश राणे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com