बातम्या
महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत - नितेश राणे
सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात.
सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात. नितेश राणे आणि संजय राऊत एकमेकांवर टीका करत असतात. नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, गौतमी पाटील ती उत्तम कलाकार आहे. ती वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन अनेकांचं मनोरंजन करते. ती स्वत:ही नाचते आणि लोकांनाही नाचवते. तसंच या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला दररोज सकाळी येऊन वाटतं की, मी लोकांचं मनोरंजन करतो. तर हा त्यांचा मोठा गैरसमज आहे.
महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत. संजय राऊत हे रोज सकाळी येऊन लोकांची सकाळ खराब करतात. हा सकाळचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे. संजय राऊतांकडं गौतमी पाटीलनं मेकअपचं सामान पाठवावं, अशी मी तिला विनंती करतो. असे नितेश राणे म्हणाले.