ठाकरे, राऊत हे खंडण्यांवर जगणारे लोक; नितेश राणेंचा हल्लाबोल

ठाकरे, राऊत हे खंडण्यांवर जगणारे लोक; नितेश राणेंचा हल्लाबोल

नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नितेश राणे म्हणाले की, ठाकरे गटातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. जसा पक्षप्रमुख तसे नेते. एक रुपयांचे उत्पन्न नसताना ठाकरेंचे जीवन आलिशान. ठाकरे, राऊत हे खंडण्यांवर जगणारे लोक आहेत. असे नितेश राणे म्हणाले.

तसेच ते म्हणाले की, 2 रुपयांचे उत्पन्न नाही खर्च करतात कुठून? पेंग्विन ठाकरेची गाडीही स्वत:ची नाही आहे. ठाकरेंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे द्यायला तयार आहे. राऊतांना आता फक्त हज यात्रेला पाठवणं बाकी आहे. राऊतांचे धर्मांतर झाले आहे. असे नितेश राणे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com