Nitesh Rane: "...तर मग मुस्लिम समाजाने पण धर्म शाळा-कॉलेज मध्ये आणू नये!"

Nitesh Rane: "...तर मग मुस्लिम समाजाने पण धर्म शाळा-कॉलेज मध्ये आणू नये!"

नितेश राणेंनी बुरखा घालून परीक्षा देण्यावर आक्षेप घेत शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहले. राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॉपीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

बुरखा घालून परिक्षा केंद्रात नको असं मत्स्य मंत्री नितेश राणेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहलेलं आहे. राज्यातील दहावी आणि बारावीच्या परिक्षेच्या पार्श्वभूमिवर नितेश राणेंनी हे पत्र लिहलेलं आहे. कॉपीचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करत त्यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांनी धर्म शाळेत आणू नये असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान नितेश राणे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की,

"बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको!" नितेश राणे

मुस्लिम विद्यार्थ्यांना बुरखा घालून परिक्षेला बसण्याची परवाणगी देण्यात यावी यावर मी मंत्र्यांना पत्र देखील पाठवलं होत. मी त्यांना स्पष्ट केलं आहे की, असं कोणतही प्रकारचं कुठल्याही लागून चालण्याचा प्रकार, आपलं हिंदुत्त्ववादी सरकार असताना होऊ नये. या देशात राहत असताना जो नियम अन्य धर्मियांना लागू होतो, तो मुस्लिम विद्यार्थ्यांनी देखील पाळला पाहिजे... माध्यमिक शाळेत उच्च माध्यमिक शाळेत परिक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता देण्याचं प्रमाणपत्र दिल्याचं परिपत्रक आहे..

कॉपीचे प्रमाण वाढण्याची भीती

असं लांगुलचालन चालणार नाही, अशी भूमिका शिक्षण मंत्र्यांकडे मांडली आहे. बुरखा घालून परीक्षेला बसल्याचे इतरही धोके आहेत. याचे धोके लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केली. हा निर्णय 2024 सालचा लागू झाला असून हे निर्णय रद्द करण्यासाठी मान्य केली. परिक्षेसोबतच मतदानाच्या वेळीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत... बुरखा घालून आलेले विद्यार्थ्यी नेमकी तेच विद्यार्थी परीक्षेला आहेत का? हे देखील पाहावं लागेल... इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com