नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मुलगी मानसी देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर मुलगी मानसी देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबीयांनं प्रतिक्रिया दिली आहे. नितीन देसाईंच्या आत्महत्येची सरकारनं चौकशी करावी अशी मागणी देसाईंची मुलगी मानसी हिनं
Published by :
shweta walge

नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबीयांनं प्रतिक्रिया दिली आहे. नितीन देसाईंच्या आत्महत्येची सरकारनं चौकशी करावी अशी मागणी देसाईंची मुलगी मानसी हिनं केलीय. एनडी स्टुडिओ सरकारनं ताब्यात घ्यावा अशी मागणीही त्यांच्या कुटुंबीयांनी केलीय. दुसरीकडं या प्रकरणातल्या दोषींनी कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणीही त्यांनी केलीय. स्टुडिओ सरकारनं ताब्यात घ्यावा ही वडिलांची शेवटची इच्छा असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलंय.

काय म्हणाली मानसी देसाईं?

महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी. स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा आणि माझ्या बाबांना न्याय द्यावा. 181 कोटींचं कर्ज घेतलं होतं, त्यातलं फेब्रुवारी 2020 पर्यंत 86.31 कोटीचं पेमेंट केलं होतं. कोव्हीडमुळे स्टुडिओ बंद करावा लागला त्यामुळे पेमेंटला उशीर झाला. पवईचं ऑफिस विकून सहा महिन्यांचं अॅडव्हान्स पेमेंट केलं होतं. बाबांचा कुणाला फसवण्याचा कधीच हेतू नव्हता. कंपनीबरोबर मिटींग करून सेटलमेंटचे प्रयत्न केले. कंपनीने आश्वासनं दिली पण कायदेशीर प्रक्रियाही सुरू केली.

दरम्यान, नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी नेहा यांनी रायगड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामध्ये फायनान्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार पैशांसाठीचा तगादा लावल्यानेच नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com