Nitin Gadkari On Nagpur Stone Pleting : अफवांवर विश्वास ठेऊ नये, शांतता प्रस्थापित करावी, नितीन गडकरी यांचं आवाहन
औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात दगडफेक करण्यात येत आहे. काही नागरिक आणि दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांचा फौज फाटा घटना स्थळी दाखल झाली असून सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून शांततेच आवाहन करण्यात येत आहे.
याचपार्श्वभुमिवर नितीन गडकरी म्हणाले की, "नागपुरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासर्व परिस्थितीमध्ये नागपुरकरांनी शांततेचा इतिहास ही नागपुरची विशेषता राहिलेली आहे. माझी सर्व बांधवांना विनंती आहे की, त्यांनी कोणत्याही प्रकराच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता प्रस्थापित करावीस, कोणीही रस्त्यावर येऊ नये. सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेला सहकार्य करावे. त्याचसोबत सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपुरकरांची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरुप आपला व्यवहार करावा. ज्या-ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्या लोकांनी गैरकृत्य केल असेल, त्यांच्यावर सरकार कारवाई करेल. असा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि मुख्यमंत्र्यांना ही यासंबंधातील संपुर्ण माहिती मिळालेली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सर्वांनी सहकार्य कराव".