ताज्या बातम्या
100 टक्के इथेनॉलवर धावणारी पहिली कार लाँच
संपूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या टोयोटा इनोव्हाच्या प्रोटोटाइपची पहिली कार आज लॉन्च झाली आहे.
नवी दिल्ली : संपूर्णपणे इथेनॉलवर चालणाऱ्या टोयोटा इनोव्हाच्या प्रोटोटाइपची पहिली कार आज लॉन्च झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कारचे अनावरण केले आहे. देशाचा अन्नदाता आता 'ऊर्जादाता' होईल, असे नितीन गडकरी यांनी म्हंटले आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, 40 टक्के प्रदूषण हे वाहतूक क्षेत्रामुळे होते. भारत दरवर्षी 16 लाख कोटी रुपयांचे तेल आयात करतो. इथेनॉलवर चालणाऱ्या या कारचा प्रोटोटाइप हा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल आहे. भारत 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य आहे.
इथेनॉल ऊस, मका, तांदूळ, भाजीपाल्याचा कचरा आणि भुसा इत्यादीपासून बनवता येते. याआधीही 2019 मध्ये ब्राझीलमध्ये इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स इंधन तंत्रज्ञानाने एक कार बनवण्यात आली होती, परंतु त्या कारचे उत्सर्जन निकष BS 6 पेक्षा कमी होते.