बातम्या
नितीन गडकरी धमकी प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे?
नितीन गडकरी यांच्य कार्यालयात धमकीचे फोन करणारा आरोपी सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे.
नितीन गडकरी यांच्य कार्यालयात धमकीचे फोन करणारा आरोपी सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. जयेश पुजारीलापुजारीला जन्मठेपेची शिक्षा झालीय.त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी जेलमधूनच गडकरींच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली, असे पुजारीने सांगितले. जयेशला बेळगावहून ताब्यात घेण्यात आलं होतं. अधिक तपासासाठी नागपूर पोलिसांची एक टीम पुन्हा बेळगावला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
जयेश पुजारीला बेळगावमध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याचा ताबा घेण्यासाठी नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला गेली होती. ही टीम आरोपी जयेश पुजारीला घेऊन नागपूरला परतली. या प्रकरणात आता नवीन मोठे खुलासे समोर आले आहेत. हे प्रकरण लवकरच केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.