Nitin Gadkari : 'समाजातील जातीवाद नष्ट झाला पाहिजे' अमरावती कार्यक्रमात नितीन गडकरी यांचे मोठं विधान
अमरावतीत श्री शिवाजी शिक्षण संथा अमरावती यांच्या द्वारे देण्यात येऱ्याला पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, खा. अनिल बोंडे, खा.बळवंत वानखडे, आ. संजय खोडके, आ. सुलभा खोडके उपस्थित राहिले होते. यामध्ये नितीन गडकरींसह विदर्भातील 2 महिला शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
तर या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी मोठ विधान केलं आहे. जनता जातीवादी नाही, पुढारी जातीवादी आहे असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. तर माणूस जातीनं नाही तर गुणांनी मोठा आहे. समाजातील जातीवाद नष्ट झाला पहिजे, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.
नितीन गडकरी म्हणाले की, "जनता जातीवादी नाही आहे पुढारी जातीवादि आहे. या समाजातील छुवाचुत अस्पृश्यता, जातीयता समुळ नष्ट झाली पाहिजे. मी माझ्या व्यवहारात ती ठेवणार नाही. या दोन गोष्टींमध्ये सुधारणा झाली तर हळू हळू समाजात बदल होईल. पंजाबरावांनी शिक्षणाचा प्रचार करत कधी कुठे एरोगन्स नाही बोलत, पण माझे जे कनेक्शन आहेत त्याने मी काम करेन".
" लोकांनी मला मतदान केलं. जनता जातीवादी नाही आहे पुढारी जातीवादि आहे. ते स्वार्थासाठी जात निर्माण करतात. मेळघाट मधील जेव्हा रस्ते होत नव्हते तेव्हा फिरेस्ट च्या मोठया अडचणी होत्या तर तेव्हा मी अधिकाऱ्यांना म्हटलं की कायदा मोडा पण रस्ते करा. जात पुढारी निर्माण करतात, जनता जातीवादी नाही तर पुढारी जातीवादी आहे. माणूस हां जातीने मोठा नाही तर गुणाने मोठा आहे", असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.